हरदोना (खुर्द) गाव गडचांदूर पो.स्टे. मध्ये समाविष्ट करा

By Admin | Updated: March 26, 2017 00:32 IST2017-03-26T00:32:29+5:302017-03-26T00:32:29+5:30

गडचांदूरपासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेले हरदोना (खुर्द) हे गाव सध्या राजुरा पो.स्टे. अंतर्गत असल्याने ....

Haradona (Khurd) village Gadchandur Po.Stay Insert into | हरदोना (खुर्द) गाव गडचांदूर पो.स्टे. मध्ये समाविष्ट करा

हरदोना (खुर्द) गाव गडचांदूर पो.स्टे. मध्ये समाविष्ट करा

महिलांची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
गडचांदूर : गडचांदूरपासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेले हरदोना (खुर्द) हे गाव सध्या राजुरा पो.स्टे. अंतर्गत असल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे गाव गडचांदूर पो.स्टे. मध्ये समाविष्ट करण्याची मागणी हरदोना (खुर्द) येथील महिलांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप खिरडकर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. व मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहे.
हरदोना (खुर्द) येथे काही दिवसांपूर्वी अवैध दारू विक्री होत होती. गावातील महिलांनी बऱ्याच वेळा दारू विक्रेत्याला पकडून राजुरा पोलिसांच्या हवाली केले. काही दिवसांपूर्वी एका चार वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या आरोपीला महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. असे अनेक प्रकार घडत आहेत.
अशा अनुचीत प्रकार घडला तर १६ किमी अंतरावरील राजुरा पो.स्टे.ला तक्रार करावी लागते. व पोलीस येथपर्यंत वाट बघावी लागते. त्यावेळी महिलांनी पकडलेले आरोपी फरार होण्याची भीती असते. किंवा महिलांनी अवैध दारुविक्रेत्याची तक्रार पोलिसांकडे केली. तर ते येईपर्यंत आपल्या मालाची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे महिलांचे मनोबलचे खच्चीकरण होते.
उपराही, अंबुजा फाटा हे ठिकाण गडचांदूर पो.स्टे. असल्याने येथील पोलिसाचे रात्रदिवस राऊंड सुरू असतात. या दोन्ही ठिकाणी गडचांदूर पोलिसांना हरदोना (खु) वरूनच जावे लागते.त्यामुळे हरदोना (खु) हे गाव गडचांदूर पो.स्टे. मध्ये समाविष्ट करावे. त्यामुळे गुन्हेगारीत घट होईल. अशी मागणी महिलांनी केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Haradona (Khurd) village Gadchandur Po.Stay Insert into

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.