आधुनिकता : बल्लारपूर पालिकेचा उपक्रमबल्लारपूर: नगर परिषद कर आकारणीची जनतेला नोटीस देते. नगरपालिकेचा कर्मचारी कर वसुलीकरिता घरी येऊन कराची रक्कम घेऊन तेथेच पावती देऊन तो कार्यालयात येतो व तीन वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी करतो. ही आजवरची कर वसुलीची प्रणाली! पण, आता बल्लारपूर नगर परिषदेने यात हँड डिवाईस नावाचे यंत्र आणले असून, त्यातील प्रिंटरमधून कराची पावती द्यायची आणि कर प्राप्त झाल्याचा संदेश करदात्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे द्यायचा, अशी विकसित नवीन प्रणाली आणली आहे. या प्रणालीद्वारा बल्लारपूर नगर परिषदेने स्मार्ट सिटीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.कर विभागात या संगणक हॅन्ड डिवाईस व प्रिंटर्सचे लोकार्पण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपीन मुदधा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. उदघाटनानंतर हे यंत्र कर निरीक्षक विलास बेले यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, गटनेता देवेंद्र आर्य, नगरसेवक विक्की दुपारे, गणेश कोकाटे, येलय्या दासरप, डॉ. अनिल वाढई व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
करवसुलीसाठी आता हॅन्ड डिवाईस यंत्र
By admin | Updated: February 29, 2016 00:35 IST