सफाई कामगाराच्या हाती सलाईनची निडल
By Admin | Updated: September 20, 2014 23:46 IST2014-09-20T23:46:43+5:302014-09-20T23:46:43+5:30
गडचांदूर शहर व परिसरात सध्या हिवताप व विषमज्वराची साथ सुरू असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उरली नाही. अशा परिस्थितीत गडचांदूरचे रुग्णालयच आजारी

सफाई कामगाराच्या हाती सलाईनची निडल
आशिष देरकर - गडचांदूर
गडचांदूर शहर व परिसरात सध्या हिवताप व विषमज्वराची साथ सुरू असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उरली नाही. अशा परिस्थितीत गडचांदूरचे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक रुग्णांना जीव धोक्यात टाकून उपचार करावा लागत आहे. रुग्णालयातील चक्क सफाई कामगारांकडून रुग्णांना सलाईन लावण्याचा प्रकार गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आला.
रेखा दानव ही महिला ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करते. एका रुग्णाला ती स्वत:च्या हाताने सलाईन लावताना प्रस्तुत प्रतिनिधीने बघितले. तिला विचारणा केली असता आपण सफाई कामगार असल्याचे तिने सांगितले. यावरून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था लक्षात येते. तुकाराम अमरू पवार (४५) हा हिवताप या आजाराने ग्रस्त आहे. या रुग्णाची भेट घेतली असता येथील परिचारिका रुग्णांशी व्यवस्थित वागत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका परिचारिकेने सलाईन अंगावर फेकून दिल्याचा त्यांचा आरोप आहे. सलाईनची नळी व रुग्णांना लागणारी औषधी बाहेरून आणावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.