कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायती प्रशासकाच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:16+5:302021-07-23T04:18:16+5:30
आवाळपूर : कोरोनाचा फटका सर्वत्र बसला असून, यातून कोणीही सुटलेले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने निर्बंध कायम ...

कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायती प्रशासकाच्या हाती
आवाळपूर : कोरोनाचा फटका सर्वत्र बसला असून, यातून कोणीही सुटलेले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने निर्बंध कायम ठेवले आहेत. यामुळे जिल्ह्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यावर आता प्रशासकाची नेमणूक करून गावपातळीवरील कामे करण्यात येणार आहेत. कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा पदभार आज, शुक्रवारी प्रशासक आपल्या हाती घेणार आहे.
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ समाप्त झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे कार्यकाळ समाप्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात येत आहे.
बॉक्स
या ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक
बेलगाव, बिबी, चनई बु., धानोली, दुर्गाडी, जेवरा, कन्हाळगाव, कातलाबोडी, खैरगाव, खिर्डी, कोठोडा बु., लखमापूर, मांडवा, मांगलहिरा, नांदा, पारडी, परसोडा, पिंपळगाव, पिपर्डा, रुपापेठ, सावलहिरा, सोनुरली, थुट्रा, उपरवाही, वडगाव, वनसडी.