भद्रावती येथे हॉलमार्किंग जागरूकता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:37+5:302021-09-04T04:32:37+5:30

फोटो भद्रावती: ग्राहक पंचायत भद्रावती यांनी हॉलमार्किंग जागरूकता, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भारतीय मानक ...

Hallmarking Awareness Campaign at Bhadravati | भद्रावती येथे हॉलमार्किंग जागरूकता अभियान

भद्रावती येथे हॉलमार्किंग जागरूकता अभियान

फोटो

भद्रावती: ग्राहक पंचायत भद्रावती यांनी हॉलमार्किंग जागरूकता, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भारतीय मानक ब्युरो, नागपूर यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण करण्यात आले होते.

१६ जून, २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर आणि सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले होते, परंतु हॉलमार्किंगविषयी ग्राहक आणि ज्वेलर्स यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भारतीय मानक ब्युरो, नागपूर यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण केले.

यावेळी ग्राहक आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबद्दल विशेष माहिती भारतीय मानक ब्युरो, नागपूरचे अधिकारी सर्वेश त्रिवेदी यांनी दिली. पीयूष वासेकर, विजय नितनवरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी पुरुषोत्तम मत्ते, तहसीलदार महेश शितोळे, गजानन पांडे, डॉ.माला प्रेमचंद, सुनीता खंडाळकर, कल्याणी मुटे, किशोर मुटे यांची उपस्थिती होती.

Web Title: Hallmarking Awareness Campaign at Bhadravati