लालतोंड्या माकडांचा हैदोस

By Admin | Updated: August 9, 2015 01:14 IST2015-08-09T01:14:51+5:302015-08-09T01:14:51+5:30

मागील सहा महिन्यांपासून कोठारीत लालतोंड्या माकडांनी सर्वत्र हैदोस घातला असून गावकरी त्रस्त झाले आहेत.

Haldos | लालतोंड्या माकडांचा हैदोस

लालतोंड्या माकडांचा हैदोस

कोठारीवासी त्रस्त : माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी
कोठारी : मागील सहा महिन्यांपासून कोठारीत लालतोंड्या माकडांनी सर्वत्र हैदोस घातला असून गावकरी त्रस्त झाले आहेत. माकडांचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेकडो गावकऱ्यांनी कोठारी वन कार्यालयात जावून वनक्षेत्रसहायक एन.आर. भोवरे यांना निवेदन दिले.
सहा महिन्यांपूर्वी परप्रांतातील लालतोंड्या माकडांना ट्रकमध्ये भरुन रात्रीच्यावेळी कोठारीच्या जंगलात सोडण्यात आले. या माकडांची फौज कोठारी गावात दाखल झाली आहे. माकडे मोठ्या प्रमाणात असून त्यांनी गावात धुडधूस घालणे सुरू केले आहे. गावकऱ्यांच्या घरात घुसून घरातील अन्न, धान्य, कपडे आदी पळवू लागले. माकडांना हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपापयोजना करुन पाहिल्या. मात्र माकडे माणसांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. उलट माणसांवर ते हल्ला करीत आहेत. परिणामी त्रस्त गावकऱ्यांनी कोठारी येथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देवून बंदोबस्ताची मागणी केली.
वनाधिकाऱ्यांनी गावात ठिकठिकाणी फटाके फोडून माकडांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र माकडे त्यांनाही जुमनात नाहीत. उलट रात्रंदिवस माकडांचा प्रकोप वाढू लागला. गावकऱ्यांचे नुकसान होवू लागले. अखेर कंटाळलेल्या गावकऱ्यांनी ७ आॅगस्टला वनकार्यालय जाऊन माकडांचा त्वरित बंदोबस्त करा किंवा गावकऱ्यांना बंदोबस्त करण्याची मुभा द्या, अशी मागणी केली. यात जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु, पं.स. सदस्या सुमन लोहे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरकडे, मोरेश्वर लोहे, विनोद बुटले, मामा जुनघरे यांचा समावेश होता. अखेर वनक्षेत्रसहाय्यक भोवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निवेदन पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे येत्या दहा दिवसांत माकडांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकरी परतले. गावात शिरून माकडे गावकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. नागरिकांना, महिलांना, बालकांमध्ये या माकडांची दहशत पसरली आहे. या माकडांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Haldos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.