लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
By Admin | Updated: February 2, 2017 00:33 IST2017-02-02T00:33:28+5:302017-02-02T00:33:28+5:30
लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम तथा आनंद मेळावा घेण्यात आला.

लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
वरोरा : लोकमत सखी मंच वरोरातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम तथा आनंद मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा माया राजुरकर तसेच उद्घाटक म्हणून डॉ. भारती साबळे उपस्थित होत्या. तसेच लोकमत सखी मंच संयोजिका उज्वला खिरटकर व सहसंयोजिका कल्पना ताटकुंडवार यावेळी उपस्थित होत्या. पाहुण्यांनी सखी सदस्यांना आरोग्यविषयक तथा कायदेविषयक माहिती सांगीतली. या कार्यक्रमात बालविकास मंचच्या सदस्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. तसेच दरवर्षी २५ पेक्षा जास्त सदस्य बनविणाऱ्या सखींचा छोटीशी भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. किर्ती कातोरे, विणा शेंडे, प्रतिभा जीवतोडे, शिरीषा गावंडे, स्मिता चांभारे, सुनिता खामनकर, ज्योती चोपणे, सुनिता नरडे, निता गजभे, वंदना दडमल, शितल खाडे, कल्पना कथडे, राजश्री कारवटकर, दर्शना आत्राम, भारती नगराळे, लिना राजुरकर, सिमा वनकर, सुषमा बोदाडकर, निता बोढे आदी सखींचा सत्कार करण्यात आला. सख्यांनी विविध वस्तुंच्या विक्रीचे व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. आजुबाजुच्या परिसरातील लोकांनी आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला. प्रत्येक वस्तुंच्या स्टॉलवर बरीच गर्दी झाली होती. संध्या आकनुरवार या सखीने काढलेल्या ‘रंगावली’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी संयोजिका उज्वला खिरटकर, कल्पना ताटकुंडवार, गजानन बोनगिरवार यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)