साईबाबा शिक्षण संस्थेतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:05+5:302021-02-05T07:43:05+5:30
चंद्रपूर : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेंढरी मक्ताच्या वतीने दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील कन्नमवार सभागृहात हळदीकुंकू कार्यक्रम ...

साईबाबा शिक्षण संस्थेतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
चंद्रपूर : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेंढरी मक्ताच्या वतीने दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथील कन्नमवार सभागृहात हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला.
यावेळी महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये उखाणे, डान्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना फुलांचे रोपटे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून सुवर्णा कावळे, सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा इंगुलवार, निर्मला बुरांडे उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्ष नंदा अल्लूरवार म्हणाल्या, महिला या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. महिलांनी संघटित लढा दिला, तर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणे सहज शक्य आहे. अशा कार्यक्रमातून महिला संघटित होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संचालन व आभार जास्मीन यांनी केले.