हळदीकुंकू आणि विविध स्पर्धा
By Admin | Updated: February 3, 2016 01:07 IST2016-02-03T01:07:36+5:302016-02-03T01:07:36+5:30
लोकमत सखी मंच नागभीडतर्फे हळदी-कुंकू आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हळदीकुंकू आणि विविध स्पर्धा
नागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्फे हळदी-कुंकू आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सोमेश्वर मुगनकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी मुगनकर तर प्रमुख अतिथी म्हणून मालाताई देशमुख होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर आरती टहलानी यांनी स्वागत गीत सादर केले. देवांगणा खुणे यांनी वंदन गीत सादर केले.
विविध स्पर्धेमध्ये उखाणे आणि तिळाचे पदार्थ या स्पर्धा घेण्यात आल्या. उखाणे स्पर्धेत सखींनी पर्यावरणावर, स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीवर होणारे अत्याचार, बेटी बचाओ बेटी पढाओ यावर उखाणे सादर केले.
त्यानंतर तिळ-गुळाचे सुंदर अशा पाककृती सखींनी स्वत: बनवून आणल्या. त्यामध्ये तिळगुळाचे लाडू, वड्या, तिळगुळाच्या करंज्या, तिळाच्या चकल्या, मालाताई देशमुख यांनी तिळगुळाचे शिवलिंग, ओम, तिळगुळाचा दिवा इत्यादी अतिशय सुंदर असे पाककृती बनवून आणले.
विशाखा जांगळे यांनी अतिशय सुंदर रांगोळी काढली. शोभा जीवतोडे यांचे सहकार्य लाभले. संचालन किरण गोडे यांनी केले. आभार रेखा देशमुख यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका संयोजिका रजनी घुटके आणि किरण गोडे यांच्यासह सखी मंच सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)