गुरुदेव सेवा मंडळाने केला शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST2021-09-06T04:31:45+5:302021-09-06T04:31:45+5:30

कोरोनाच्या काळातही ही शाळा अध्ययन अध्यापनाचे कार्य नियमित करीत असून, नुकतीच ही शाळा महाराष्ट्रातील ४८८ आदर्श शाळेतील एक आदर्श ...

Gurudev Seva Mandal felicitated the teachers | गुरुदेव सेवा मंडळाने केला शिक्षकांचा सत्कार

गुरुदेव सेवा मंडळाने केला शिक्षकांचा सत्कार

कोरोनाच्या काळातही ही शाळा अध्ययन अध्यापनाचे कार्य नियमित करीत असून, नुकतीच ही शाळा महाराष्ट्रातील ४८८ आदर्श शाळेतील एक आदर्श शाळा म्हणून घोषित झालेली आहे. शाळेत नियमित अध्ययन, अध्यापना व्यतिरिक्त दैनंदिन उपक्रम राबविले जातात. शिक्षक दिनी याच शाळेतील बालकांनी आकाशवाणी चंद्रपूरवरून बालसभा या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. शाळेच्या कार्याची दखल घेऊन गावकऱ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक अशोक गोरे, घनश्याम पाचभाई, नीलेश मडावी, मंगला उरकुडे, छाया कोडमेलवार, रेखा झाडे, मंगला चटप या शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका समन्वयक खुशालराव गोहोकार, आबाजी पाटील बोबडे, मधुकर लोडे, घुलाराम वरारकर, भिवसन बोभाटे, सुनील थेरे, दशरथ गोहोकार आदी उपस्थित होते.

Web Title: Gurudev Seva Mandal felicitated the teachers