गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:12+5:302021-03-19T04:27:12+5:30
चंद्रपूर : दहावी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर येथील गुरुकुल क्लासेसच्या वतीने घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चंद्रपूर : दहावी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर येथील गुरुकुल क्लासेसच्या वतीने घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत हजबन, चिलड्रेन्स स्कूलचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे केजीएन महाविद्यालयाचे अध्यक्ष फिरोझ पठाण, गुरुकुल क्लासेसचे संचालक प्रा. योगेश खेडेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी व पालकांनी स्थानिक पातळीवर उत्तम शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवर विश्वास ठेवण्याबद्दलचे मत प्रशांत हजबन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. स्थानिक शिक्षक आपल्या विषयात पारंगत असल्यास पालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरिता आपल्या मुलाचा हात स्थानिक शिक्षकाकडे देणे गरजेचे आहे. शिवाय, पालकांनी आपल्या पाल्याची बौद्धिक कुवत पाहता व त्याची आवड निवड पाहता योग्य क्षेत्रात पुढे नेणे गरजेचे असल्याचे मत फिरोझ पठाण व प्रा. योगेश खेडेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अविनाश ताडूरवार, त्रिलोक गांधी, यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन सुहासिनी अक्कनपल्लीवार यांनी तर सुनील ठाकूर यांनी आभार मानले.