‘से नो टू क्राईम’वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:15 IST2016-08-12T01:15:30+5:302016-08-12T01:15:30+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या वतीने ‘से नो टू’ हा लैंगिक अन्याय,

‘से नो टू क्राईम’वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सिंदेवाही पोलीस ठाणे : महाविद्यालयात जनजागृती
सिंदेवाही : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या वतीने ‘से नो टू’ हा लैंगिक अन्याय, अत्याचारावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. बी. पाथोडे होते. प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत शाळा व्यवस्थापन, पालक, विद्यार्थी व समाज यांच्या जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचाराविरुद्ध कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन उद्धवस्त होऊ शकते. विद्यार्थी व पालक यांनी याबाबत दक्ष राहून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. तक्रारकर्त्यांचे नाव गुपीत ठेवून कारवाई केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांनी सांगितले.
व्हीडीओ, आॅडिओ क्लीपच्या माध्यमातून सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य एच.बी. पाथोडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदीप मेश्राम यांनी तर पर्यवेक्षक दिलीप लोडेल्लीवार यांनी प्रास्ताविक केले. (पालक प्रतिनिधी)