विद्यार्थिनींना आरोग्य तसेच कायद्याविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:05+5:302021-03-16T04:29:05+5:30
चंद्रपूर : विद्यार्थिनी तसेच महिलांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात काळजी कशी घ्यायची तसेच त्यांच्यासाठी असलेल्या सुरक्षाविषयक कायद्याविषयी माहिती व्हावी, या ...

विद्यार्थिनींना आरोग्य तसेच कायद्याविषयी मार्गदर्शन
चंद्रपूर : विद्यार्थिनी तसेच महिलांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात काळजी कशी घ्यायची तसेच त्यांच्यासाठी असलेल्या सुरक्षाविषयक कायद्याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने विद्यार्थिनी तसेेच महिलांसाठी आरोग्य व शिक्षणासंदर्भात समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ऋजुता मुंधडा, शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपरनिरीक्षक प्राजक्ता नागपुरे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य धनंजय चापले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक उल्हास नरड यांच्या सहकार्याने पार पडला.
यावेळी डॉक्टर ऋजुता मुंधडा यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी शारीरिक-मानसिक, सामाजिक विकास कसा करावा, काय केले पाहिजे यावर तर प्राजक्ता नागपुरे यांनी महिला सुरक्षा तसेच कायदे यावर मार्गदर्शन केले.
संचालन कल्पना बनसोड, प्रास्ताविक डॉ.ज्योती राजपूत, संदेश वाचन ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुले, आभार अलका दीपक ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता विनोद लवांडे, अधिव्याख्याता संजयकुमार मेश्राम, सपना पिंपळकर, विवेक इत्तडवार, धनराज येलमुलवार, अमोल बल्लावार, रवींद्र तामगाडगे आदींनी सहकार्य केले.