सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
By Admin | Updated: October 18, 2014 23:23 IST2014-10-18T23:23:43+5:302014-10-18T23:23:43+5:30
येथील वृंदावन सभागृहामध्ये सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर गुरूवारी मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरामध्ये कामगारांचे नेते सी. कुमार यांनी मार्गदर्शन केले.

सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
भद्रावती : येथील वृंदावन सभागृहामध्ये सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर गुरूवारी मार्गदर्शन शिबिर पार पडले. शिबिरामध्ये कामगारांचे नेते सी. कुमार यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सी.एस.डी. कॅन्टीनमधून पूर्वीप्रमाणे स्वस्त दरातील साहित्य देण्यात यावे. यासंबंधी संरक्षण मंत्रालय व भारत सरकारशी होत असलेल्या चर्चेसंबंधी सविस्तर माहिती दिली. सातव्या वेतन आयोगामध्ये पेन्शन कशी व का वाढ करण्यात यावी, जे कर्मचारी चार-पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांचे फिक्शेशन बरोबर न झाल्याने पेन्शन कमी मिळत आहेत. त्यांचे फिक्शेशन बरोबर करण्यासाठी काय करावे. पी.पी.ओ. आॅर्डरमधील त्रुटी दूर करण्यासंबंधी ज्या कर्मचाऱ्यांना लेबर ‘बी’ मध्ये २४ वर्षे पूर्ण झाले. परंतु त्यांना एक हजार ९०० ग्रेड पे नुसार पेन्शन मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अकाऊन्ट विभागामध्ये जे काम थांबले आहे. त्याला गती आणण्यासाठी काय करावे, यासंबधी त्यांनी मार्गदर्शन केले व त्वरित सेवानिवृत्तीचे संगठन रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला दिला.
कॉ. पी.के. मोहन यांनी सी.जी.एच.एस. हॉस्पीटल मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपचार करताना काय अडचणी येतात, त्या कशा दूर कराव्यात तसेच बऱ्याच बँकांमधून वाढलेला आहे. वेळेवर लावण्यात येत नाही. त्यामुळे पेन्शन्मध्ये वाढ होत नाही. निवृत्तीवेतनधारकांना बँकेत सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. तेव्हा आपण काय करायला पाहिजे, त्याबद्दल मार्गदर्शन करून कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक कॉ. डी.एच. उपासे यांनी केले. अध्यक्षस्थानी कॉ. एम.यू., कामगार नेते बी.बी. मुजुमदार होते. शिबिराचे संचालन जे.आर. रामटेके यांनी केले, तर आभार एस.के. इटनकर यांनी मानले. शिबिराला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गडचिरोली, गोंडपिपरी, वणी, वरोरा, वर्धा, हिंगणघाट येथील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी बोरकर, पप्पु गेडाम यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)