फोटोग्राफर्सच्या छायाचित्र प्रदर्शनीला पालकमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:43 IST2017-08-22T23:42:37+5:302017-08-22T23:43:06+5:30
पॉवर सिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या कला दालनात १९ ते २१ आॅगस्ट पर्यंत चाललेल्या तीन दिवसीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाला.....

फोटोग्राफर्सच्या छायाचित्र प्रदर्शनीला पालकमंत्र्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पॉवर सिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या कला दालनात १९ ते २१ आॅगस्ट पर्यंत चाललेल्या तीन दिवसीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाला रविवारी वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनाचे कौतुक करुन लग्न सोहळा प्रसंगीचे छायाचित्र अत्यंत बोलके व निसर्ग व वन्यजीवचे छायाचित्र एकापेक्षा एक सरस असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
भेटीदरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पावर सिटी क्लबच्या वतीने गोलू बाहाराते व देवानंद साखरकर यांनी फोटो प्रेम व स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.
यावेळी त्यासोबत नगरसेवक सुभाष कासोनगोट्टूवार, माजी नगरसेवक संजय वैद्य, पॉवर सिटी फोटोग्राफर क्लबचे सदस्य गोलू बाराहाते, देवानंद साखरकर, व्यंकेटश नरखेडकर, विशाल वाटेकर, अतुल कोत्रीवार, अमोल मेश्राम, राकेश बेलसरे, राहूल चिलगीलवार आदी उपस्थित होते.