कोठारीच्या वीज समस्येची पालकमंत्र्यांकडून दखल

By Admin | Updated: June 24, 2015 01:29 IST2015-06-24T01:29:22+5:302015-06-24T01:29:22+5:30

कोठारी येथील वीज समस्या ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतली आही.

Guardian's power problem is interrupted by the Guardian | कोठारीच्या वीज समस्येची पालकमंत्र्यांकडून दखल

कोठारीच्या वीज समस्येची पालकमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर : कोठारी येथील वीज समस्या ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतली आही. त्यांनी कोठारी येथे कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी अभियंता कन्नोजे, उज्वल धामनगे, विनायक कोसरे, स्वप्नील करकुडे, रुपेश वासमवार, संतोष लोमगाडगे, जगदीश लोहे, सुनील फरकडे, सुरेश राजुरकर, अनिल मुंडे, प्रशांत टिंबडिया, दिनेश भटारकर, उमेश मोरे, अक्षय लोहे व नामदेव वडगणे यांनी कोठारी येथे भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार कोठारी येथील कृषी वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवणे, कोठारी ते गोंडपिपरी वीज पुरवठा सुरु ठेवणे व कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता देणे या तीन बाबी वीज विभागाने दोन दिवसांत देण्याचे ग्रामस्थांना सांगितले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे कोठारीवासियांची वीज समस्या आता सुटणार आहे. कायमस्वरूपी अभियंता नियुक्त करण्यात आल्याने आतातरी वीज समस्या उद्भवणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Guardian's power problem is interrupted by the Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.