राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी पालकमंत्र्यांची प्रार्थना
By Admin | Updated: March 13, 2017 00:40 IST2017-03-13T00:40:05+5:302017-03-13T00:40:05+5:30
भारत देशात एकता व अखंडता कायम राहावी, शांतता नांदावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी कुसळ येथे हजरत दुलेशहा बाबा दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली.

राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी पालकमंत्र्यांची प्रार्थना
गडचांदूर : भारत देशात एकता व अखंडता कायम राहावी, शांतता नांदावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी कुसळ येथे हजरत दुलेशहा बाबा दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली.
शनिवारी कुसळ येथे कौमी एकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुसळ येथील पवित्र दर्ग्याच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी सय्यद आबीद अली, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, वरोराचे नगराध्यक्ष एहतेशाम अली, जि.प. सदस्य देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे, समीर केने, पं.स. सदस्य मुमताज जावेद, नगरसेवक सोहेल अली, सरपंच चंद्रभान तोडासे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रफीक शेख, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान मंसुर सेठ, इस्माईल शेख, सुभाष तुरानकर, जुबेर शरीफ, सुनील देरकर तथा इतर उपस्थित होते. याप्रसंगी मुंबईचे कव्वाल अजीम नाज व मुजफ्फरनगरचे अफजल साब्री यांच्यात दुय्यम कव्वालीचा मुकाबला झाला. तत्पूर्वी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन सय्यद आबीद अली यांनी केले. (वार्ताहर)
माथा-कुसळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने पाऊल उचलले जाईल. त्यासाठी निधीही तात्काळ मंजूर करण्यात येईल.
- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री