पालकमंत्र्यांनी केली उद्यानाची पाहणी

By Admin | Updated: September 10, 2016 00:44 IST2016-09-10T00:44:13+5:302016-09-10T00:44:13+5:30

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शुक्रवारी बल्लारपूर मार्गावरील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद निसर्ग उद्यानाची पाहणी करुन ...

Guardian Minister reviewed the park | पालकमंत्र्यांनी केली उद्यानाची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली उद्यानाची पाहणी

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शुक्रवारी बल्लारपूर मार्गावरील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद निसर्ग उद्यानाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 
यावेळी त्यांच्यासोबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, विभागीय व्यवस्थापक एस.बी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी उद्यानातील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे अब्दुल कलाम आझाद यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्प वाहिले. त्यांनी उद्यानाची पाहणी करुन उद्यानाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लक्ष्मणझुल्याची पाहणी करुन उद्यानात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. उद्यानातील तलावात राजहंस किंवा सिकारा पक्ष्यांच्या आकाराची पायडल बोट तसेच उद्यानात प्राणी व पक्ष्यांच्या प्रतिकृतीचे बेंचेस पर्यटकांना बसण्यासाठी तयार करण्यात यावे. तसेच उद्यानामध्ये कोणकोणत्या सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Guardian Minister reviewed the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.