जीएसटीमुळे बाजारपेठेत अव्वल दर्जा प्राप्त होणार
By Admin | Updated: June 20, 2017 00:34 IST2017-06-20T00:34:48+5:302017-06-20T00:34:48+5:30
जीएसटी सहज सोपी करप्रणाली असून या कर प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत अव्वल दर्जा प्राप्त करणार आहे.

जीएसटीमुळे बाजारपेठेत अव्वल दर्जा प्राप्त होणार
संजय धोटे : राजुरा येथे कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : जीएसटी सहज सोपी करप्रणाली असून या कर प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत अव्वल दर्जा प्राप्त करणार आहे. जागतीक बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होऊन देशाच्या विकासात मोठी क्रांती घडून येईल, असे प्रतिपादन आ. संजय धोटे यांनी केले.
शिवाजी महाविद्यालय, राजुराच्या अर्थशास्त्र विभाग आणि एमसीव्हीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटी कर प्रणालीवर एक दिवसीय कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार तर प्रमुख वक्ते म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचे प्रा. डॉ. करगसिंग राजपूत, जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आशिष महातळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुराचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष जसविंदरसिंग धोतरा, संचालक दिलीप नलगे, साजीब बियाबाणी, दौलतराव भोगळे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, उपप्राचार्य प्रा. सुधाकर धांडे, पर्यवेक्षक प्रा. आर. डी. बारई, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपनाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विशाल मालेकर, शिवाजी महाविद्यालय राजुराचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वामन उलमाले, सय्यद आबीद अली उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.एम. वरकड यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी तर आभार अविनाश जाधव यांनी मानले. याप्रसंगी व्यापारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.