जीएसटी पोर्टल करदात्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:29+5:302020-12-30T04:38:29+5:30

चंद्रपूर : वस्तु व सेवा कर सुरळीत होत असताना आॅनलाईन पोटलमधील तांत्रिक घोळ अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे ...

GST portal a headache for taxpayers | जीएसटी पोर्टल करदात्यांसाठी डोकेदुखी

जीएसटी पोर्टल करदात्यांसाठी डोकेदुखी

चंद्रपूर : वस्तु व सेवा कर सुरळीत होत असताना आॅनलाईन पोटलमधील तांत्रिक घोळ अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक करदात्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जीएसटी कर भरणे सोपे व्हावे, यासाठी पोर्टल तयार केले. मात्र, यापोटर्लमध्ये सातत्याने तांत्रिक कारणामुळे बिघाड येत आहे. यामुळे करभरणा तसेच इतरबाबी कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पेमेंट विंडो आपोपाप लॉगआऊट होणे, रिप्लाय पाईल होऊ न शकणे, ईमेट आयडी आणि मोबाईल क्रमांक देऊन क्रेडेन्शिअल न मिळणे, चालान होत असताना सेवा विस्कळीत होणे, जीएसटी ३ बी पार्म भरूनही न भरलेल्या दाखविणे अशा अनेक अडथळ्यांमुळे जीएसटी पोर्टल हाताळणे अशक्य होऊन बसले आहे. कंपोझिशल डीलरला वर्षानंतर एकदा जीएसटी ४ अर्ज भरावा लागतो. अशा स्थितीत पोर्टलमध्ये तांत्रिक घोळ व्यावसायिकांसाठी अडचणीचा ठरत आहे.

Web Title: GST portal a headache for taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.