गुणवंत गौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार
By Admin | Updated: August 28, 2015 01:16 IST2015-08-28T01:16:54+5:302015-08-28T01:16:54+5:30
चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षीक आमसभा महसूल भवन पाण्याच्या टाकीजवळ नागपूर रोड चंद्रपूर येथे मंगळवारी घेण्यात आली.

गुणवंत गौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार
चंद्रपूर : चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी पतसंस्थेची वार्षीक आमसभा महसूल भवन पाण्याच्या टाकीजवळ नागपूर रोड चंद्रपूर येथे मंगळवारी घेण्यात आली. यात गुणवंतांचा व सेवानिवृत्तांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
वाचन संस्कृती घरोघरी पोहचावी या उद्देशाने पुष्पगुच्छ ऐवजी प्रेरणादायी पुस्तक देऊन आमसभेला सुरुवात करण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्निक व गुणवंत विद्यार्थ्यांना ‘ताई मी कलेक्टर व्हणार, माझा साक्षात्कारी हृदयरोग, अग्नीपंख, गरूडझेप आणि कोल्हाटयाचं पोर आदी प्रेरणादायी पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे यांनी पतसंस्थेची झालेली प्रगती व पुढील वाटचाल या विषयावरील आपले विचार व्यक्त करून पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे म्हणून इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वनाचे महत्त्व, भारतीय संस्कृती व आरोग्यासंबंधी नैसर्गिक उपचार पद्धती यावर विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मोरेश्वर हेडावू यांनी मागील पाच वर्षात संस्थेच्या झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. अहवाल वाचन संस्थेचे मानद सचिव योगेश धकाते यांनी केले. (प्रतिनिधी)