शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन
By Admin | Updated: August 31, 2016 00:47 IST2016-08-31T00:47:33+5:302016-08-31T00:47:33+5:30
शहीद बाबुराव शेडमाके यांच्या शहीद स्थळावर असलेल्या सामाजिक ध्वजाशेजारी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकविला.

शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन
चंद्रपूर : शहीद बाबुराव शेडमाके यांच्या शहीद स्थळावर असलेल्या सामाजिक ध्वजाशेजारी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकविला. त्यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. नंतर दुचाकीने तिरंगा रॅली काढण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना, १८५७ चे क्रांतीकारी शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची शहीदभूमी ही चंद्रपुरात असून त्यावर राष्ट्रीय ध्वज चढवून राष्ट्रीय योद्धा असल्याचे जाहीर करतो. शहीदभूमीच्या सौंदर्यीकरणाकरिता कामाला सुरुवात करून चंद्रपूर जिल्ह्याला शोभेल असे शहीदभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी समितीचे अध्यक्ष दयालाल कनाके, उपाध्यक्ष विलास मसराम तथा सदस्य तुळशिदास ताडाम, श्याम गेडाम, विठ्ठल कुमरे, प्रकाश कुमरे, साईराम मडावी, अरुण येरमे, दिलीप आत्राम, आत्माराम मडावी, नथ्थू गेडाम, कमलेश आत्राम, विरेंद्र आत्राम, धीरज शेडमाके, विनोद मसराम, मोहन मसराम यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)