चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांना अभिवादन कार्यक्रम
By Admin | Updated: November 19, 2016 00:58 IST2016-11-19T00:58:40+5:302016-11-19T00:58:40+5:30
१९ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांना अभिवादन कार्यक्रम
चंद्रपुरात विविध कार्यक्रम : संगीत संध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन
चंद्रपूर : १९ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला जाते. १९ नोव्हेंबर २०१६ ते १९ नोव्हेंबर २०१७ हे इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरा होत असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प अखिल भारतीय काँगे्रस पक्षाने केला होता. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर शनिवारला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० वाजता प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या सर्व फंटलच्या तसेच विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीतर्फे सकाळी १० वाजता प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथे स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाचा कार्यक्रम तसेच ‘एक शाम इंदिरा जी के नाम’ संगीत संध्या सांस्कृतिक कार्यक्रम गांधी चौक, महानगरपालिकेच्या खुल्या पटांगणावर सायंकाळी ६ आयोजित केले आहे. या कार्यक्रमास सर्व आमदार, माजी आमदार, माजी खासदार, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, सर्व काँग्रेस फंटाल आॅरगनायझेशन, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी कळविले आहे.