भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन

By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:46+5:302016-01-02T08:34:46+5:30

समता सैनिक दलासह विविध आंबेडकर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला

Greetings to Ambedkar followers in Bhima-Koregaon Vijaysthan | भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन

भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन

चंद्रपूर : समता सैनिक दलासह विविध आंबेडकर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भीमा-कोरेगाव विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
प्रारंभी सामूहिक वंदना, भीमस्तुती भीम स्मरण करून समता सैनिक दलाने भीमा-कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी भारिप बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी राजू कीर्तक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती रौप्य समितीचे प्रविण खोबरागडे व सदस्य मोहन रायपुरे इतिहास संशोधक आचार्य टी.टी. जुलमे, प्रा. एस.टी. चिकटे, बुद्धिस्ट समन्वय समितीचे हरिष सहारे, बनकर, दी बुद्धिस्ट सोसा. नेताजी भरणे, भाऊराव दुर्योधन, वामनराव सरदार अन्य पदाधिकारी तेजराज भगत, रामजी जुनघरे, प्रेमदास बोरकर, द्रौपदी काटकर, सविता कांबळे, सुरेश नारनवरे, प्रतिक डोर्लीकर, समता सैनिक दल अ‍ॅड. सत्यविजय उराडे, अ‍ॅड. बाबुराव शेंडे, बारसागडे, फुले-आंबेडकर विचार संवर्धन समितीचे गोपाळराव देवगडे, प्रदीप अडकिणे, ई.एस. मेश्राम, देशपांडे आदींची उपस्थिती होती.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Ambedkar followers in Bhima-Koregaon Vijaysthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.