सुभाष वाॅर्डात सुरू झाली ग्रीन जिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:00+5:302021-08-23T04:30:00+5:30

बल्लारपूर : येथील सुभाष वॉर्ड जोकू नाला परिसरात असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानम परिसरातील मोकळ्या जागेत बल्लारपूर नगरपालिकेने ...

Green Gym started in Subhash Ward | सुभाष वाॅर्डात सुरू झाली ग्रीन जिम

सुभाष वाॅर्डात सुरू झाली ग्रीन जिम

बल्लारपूर : येथील सुभाष वॉर्ड जोकू नाला परिसरात असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानम परिसरातील मोकळ्या जागेत बल्लारपूर नगरपालिकेने ग्रीन जिम सुरू केली आहे. यामुळे या वाॅर्डातील नागरिकांना व्यायाम करणे सोईचे झाले आहे.

जिमचे उद्घाटन शहराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बल्लारपूर नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य शिवचंद द्विवेदी, नगरसेवक राकेश यादव, श्रीनिवास सुंचूवार आदींची उपस्थिती होती.

या परिसरातील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. नागरिकांनी या संदर्भात पालिका प्रशासनाला विनंती केली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीला गांभीर्याने घेत नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी येथे ग्रीन जिम सुरू केली.

यामुळे परिसरातील नागरिकांना व्यायाम करणे सोयीचे झाले आहे.

यावेळी नगराध्यक्षांसह शिवचंद द्विवेदी, राकेश यादव यांनीही मार्गदर्शन केले. संचालन श्रीनिवास सुंचुवार, आभार मानसिंग खेंगार यांनी मानले. यावेळी भुरेलाल खेंगर, तेजस सुंचुवार, अक्षय खेंगर, कुलदीप सुंचुवार, प्रदीप सिंग, कुलदीप सिंग, आदित्य निषाद, खुशी निषाद इत्यादींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Green Gym started in Subhash Ward