शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्याकंच ‘भारतमाता’ शब्दांची ‘गिनीज’मध्ये नोंद; विविध २६  प्रजातींच्या ६५ हजार रोपट्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 06:24 IST

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे.

चंद्रपूर : विविध  प्रकारच्या २६  प्रजातींच्या हिरव्याकंच ६५ हजार ७२४ रोपट्यांचा वापर करुन  वनविभागाने रामबाग येथे ‘भारतमाता’ शब्दांची निर्मिती केली आहे. या अभिनव उपक्रमाची शनिवारी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंद झाली.  चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. यात पर्यटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच विविध प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. वन कर्मचाऱ्यांनी वन्य प्रेमींच्या मदतीने तो प्रत्यक्ष साकारला. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

रोपट्यांचे उद्यान तयार होणार : - ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या नावाने वनविभागाने एक उद्यान साकारावे.-  प्राप्त झालेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे, अशा सूचना वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.   

महाराष्ट्र वन विभागाने आतापर्यंत चार ‘लिम्का रेकॉर्ड’वर मोहोर उमटवली. आता  प्रथमच वनविभागाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केले आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. -सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारVidarbhaविदर्भ