शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चंद्रपूर जिल्ह्यावर भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 14:30 IST

चंद्रपूर जिल्हा सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे.

ठळक मुद्देतप्त उन्हात हजारो गावे तहानलेलीखड्डा खोदून त्यातील पाणी प्यावे लागत आहे गावकरी मध्यरात्री उठून पाणी भरतात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. मात्र प्रत्यक्षात हजारो गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावलेला नाही. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. त्यामुळे नागरिक दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.जिल्ह्यातील अकराही मोठे सिंचन प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा आहे. नद्यांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. हातपंप, विहिरी, बोअरवेल यामध्येही पाणी नाही. लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.), खिर्डी, वडगाव, चन्नई, मांगलहिरा, कोरपना, वनसडी, पिपर्डा, कोडशी (बु.), धोपटाळा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भुरी येसापूर, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डा खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे राहतात. मध्यरात्री उठून पाणी भरतात. लहानसहान नद्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे तिथूनही पाणी आणणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात एखाद्याच्या घरात लग्नसोहळा असेल तर पाण्याची तजवीज कशी करावी, हाच सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकत आहे. नागरिकांसोबत जनावरांच्या चारा आणि पाण्याचाही प्रश्न बिकट होत चालला आहे. गावखेड्यातील पाण्याचे स्रोत आटले असल्याने जनावरांना पाणी पाजायला कुठे न्यावे, हे पशुपालकांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे कवडीमोल भावात जनावरे विकली जात आहेत.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई