गोंडपिपरीत जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:12+5:302021-04-24T04:28:12+5:30
वढोली : कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला गोंडपिपरी तालुक्यात ...

गोंडपिपरीत जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद
वढोली : कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला गोंडपिपरी तालुक्यात नागरिक व व्यावसायिक उत्तम प्रतिसाद देत आहेत.
विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर गांधी चौक, शिवाजी चौक, धाबा क्रॉसिंग परिसरात ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी तर विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
अशातच तालुक्यात मोठ्या प्रमाणात रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घरकामासाठी साहित्य मिळत नसल्याने व उन्हाळा असल्याने नागरिकांच्या हाताला काम नसल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. सोबतच हातगाडीवर फिरून वस्तू विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील काही गावात लाॅकडाऊन काळात सुगंधित तंबाखूचा व्यापार मात्र जोर धरू लागला आहे. संचारबंदीतही प्रशासकीय यंत्रणेला चकमा देत गोंडपिपरीतून ग्रामीण भागात करंजीच्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून आयात निर्यात सुरू आहे.