ग्रामदर्शन कनिष्ठ महाविद्यालयात महाकरिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:11+5:302021-01-23T04:29:11+5:30
महाकरिअर, व्यवसाय मार्गदर्शन सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पं. स. चे साधनव्यक्ती संजय पंधरे, साधनव्यक्ती यशवंत सोनवाणे उपस्थित होते. मार्गदर्शक ...

ग्रामदर्शन कनिष्ठ महाविद्यालयात महाकरिअर
महाकरिअर, व्यवसाय मार्गदर्शन सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पं. स. चे साधनव्यक्ती संजय पंधरे, साधनव्यक्ती यशवंत सोनवाणे उपस्थित होते.
मार्गदर्शक संजय पंधरे यांनी महाकरिअरबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. रोजगार व व्यवसायाचे अनेक मार्ग आहेत. ते आपण निवडावेत व त्याप्रमाणे आपण अभ्यासाची तयारी करावी, असे विद्यार्थ्यांना सांगितले. यशवंत सोनवाणे यांनी महाकरिअर पोर्टलवरील माहिती आपण कशी शोधायची, त्यासंबंधाने विस्तृत माहिती सांगितली.
प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी महाकरिअर पोर्टलचा वापर करून भविष्यातील नोकरी व व्यवसायातील पर्याय विद्यार्थ्यांनी निवडून आपले आयुष्य घडवावे व आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक करावा. आपल्याला शैक्षणिक बाबीमध्ये ज्या अडचणी येतील, त्या आम्ही विद्यालयाच्या वतीने पूर्ण करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.
सूत्रसंचालन शेरकी यांनी तर मडावी यांनी आभार मानले.