कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना विशेष रजा मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:40+5:302020-12-14T04:39:40+5:30

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी चंद्रपूर : कोरोना संकटात शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत राज्यात ...

Grant special leave to corona positive teachers | कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना विशेष रजा मंजूर करा

कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना विशेष रजा मंजूर करा

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

चंद्रपूर : कोरोना संकटात शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत राज्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचे निर्देश होते. त्या अनुषंगाने चाचणीनंतर बरेच शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विलगीकरण रजेचा कालावधी शासनाने विशेष रजा म्हणून घोषित करावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे व जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी शासनाकडे निवेदन दिले

या मागणीसाठी नुकतेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभेचे आयोजन करण्यात यावे यासाठी सुध्दा शिक्षणाधिकाऱ्यांना

निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सल्लागार देवराव निब्रड, संघटक मनोज वासाडे, सचिन तपासे, सुरेंद्र अडबाले, भालचंद्र धांडे, रवि बनपुरकर, महेश पानघाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Grant special leave to corona positive teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.