दादाजी माकडेने दाखविले मानवतेचे दर्शन

By Admin | Updated: March 7, 2016 00:47 IST2016-03-07T00:47:17+5:302016-03-07T00:47:17+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणो) येथील दादाजी माकडे (४०) हा वर्षीय इसम घराकडे जात असताना रस्त्यावर पॉकेट सापडला.

Grandfather's View of Humanity | दादाजी माकडेने दाखविले मानवतेचे दर्शन

दादाजी माकडेने दाखविले मानवतेचे दर्शन

पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणो) येथील दादाजी माकडे (४०) हा वर्षीय इसम घराकडे जात असताना रस्त्यावर पॉकेट सापडला. पॉकेट उचलून पाहिला असता तो नवनाथ रामाजी उरकुडे यांचा असल्याची खात्री झाली. त्यांनी तो पाकीट व त्यातील दोन हजार रूपये, तीन एटीएम कार्ड व महत्त्वाचे कागदपत्रे पंचासमक्ष परत करून मानवतेचे दर्शन दिले.
नांदगाव (जाणी) येथील सरपंच मुक्ताबाई नवनाथ उरकुडे यांच्या घरी प्रस्तुत प्रतिनिधी माहिती घेत असताना दादाजी माकडे हे हातात पॉकीट घेऊन घरी आला. त्यांना विचारणा, केली असता, ते म्हणाले ‘मला पॉकीट रस्त्यावर मिळाला. त्यात दोन हजार रूपये, तीन एटीएम कार्ड व महत्वाचे कागदपत्रे आहेत. ते नवनाथ भाऊचे आहे. हा पॉकीट तुमच्या समोर मी परत करीत आहे, असे सांगत पॉकीट परत केला. यावेळी सरपंच मुक्ताबाई एकनाथ उरकुडे, नवनाथ लहानु उरकुडे, सुमत्रा रामाजी उरकुडे, मधुकर मेश्राम व नांदगाव (जाणी) येथील नागरिक उपस्थित होते.
रस्त्यावर भेटलेला पाकीट किंवा अन्य वस्तू अनेक जण परत करीत नाही. परंतु, दादाजी माकडे याने ते पॉकीट व त्यातील दोन हजार, तीन एटीएम कार्ड व महत्वाचे कागदपत्रे परत करून खऱ्या मानवतेचे दर्शन घडविले. (वार्ताहर)

Web Title: Grandfather's View of Humanity