ग्रामसेविकेला लाच घेताना अटक
By Admin | Updated: October 26, 2016 00:55 IST2016-10-26T00:55:22+5:302016-10-26T00:55:22+5:30
बिल काढण्याच्या कामासाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामसेविकेला चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली.

ग्रामसेविकेला लाच घेताना अटक
सावली : बिल काढण्याच्या कामासाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामसेविकेला चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. अरुणा शेंडे असे अटक केलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. शेंडे या सावली तालुक्यातील थेरगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारकर्त्याने रस्त्याच्या बांधकामासाठी १७० ब्रॉस मुरुमाचा पुरवठा केला होता. तक्रारकर्त्यानी सदर बिलाची मागणी ग्रामसेविका शेंडे यांच्याकडे केली. त्यावेळी शेंडे यांनी आजपर्यंत तुमच्या कामाचे एक लाख २५ हजार ७२६ रुपयाचे बिल काढले. त्या बिलाचे पाट टक्के प्रमाणे सहा हजार ३०० रुपये देण्याची मागणी केली. याची तक्रार तक्रारकर्त्यांनी चंद्रपूर येथील लाचलूचपत विभागाला केली.
यावेळी लाचलूचपत विभागाने सापळा रचून तक्रारकर्त्याला पैसे घेऊन शेंडे यांच्याकडे पाठविले. त्यावेळेस शेंडे यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)