चुकीचा प्रस्ताव पाठविणारे ग्रामसेवक होणार निलंबित

By Admin | Updated: February 7, 2015 00:31 IST2015-02-07T00:31:29+5:302015-02-07T00:31:29+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावांत राजीव गांधी भवन बांधकामाबाबत जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागितले होते.

Gramsevak sending wrong proposal will be suspended | चुकीचा प्रस्ताव पाठविणारे ग्रामसेवक होणार निलंबित

चुकीचा प्रस्ताव पाठविणारे ग्रामसेवक होणार निलंबित

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावांत राजीव गांधी भवन बांधकामाबाबत जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागितले होते. मात्र काही ग्रामसेवकांनी जागा नसतानाही प्रस्ताव पाठविले. यामुळे या गावातील भवनाचे बांधकाम रखडले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधान्यांनी केल्याने सदर ग्रामसेवकांना निलंबित करण्याचा ठराव शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. याशिवाय दारुबंदी, बांधकाम विभाग तसेच शौचालयासंदर्भातील विषयांवर चांगलाच गोंधळ झाला.
राजीव गांधी सेवा भवन बांधकामासाठी ४८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. मात्र यातील काही ग्रामसेवकांनी बांधकाम करण्यासाठी जागा नसतानाही जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवून भवनाची मागणी केली. जिल्हा परिषदेने निधी मंजूर केला मात्र जागाच नसल्याने भवन बांधायचे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने बांधकाम रखडले. यासंदर्भात काँग्रेसचे विनोद अहिरकर, डॉ. सतीश वारजूकर यांनी प्रश्न उपस्थित करून चुकीचा प्रस्ताव पाठविणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. जिल्ह्यात दारुबंदीची शासनानाने घोषणा केली. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्यावा, अशी विनंती केली. मात्र यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.

Web Title: Gramsevak sending wrong proposal will be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.