वासेरात दोन वर्षांनी झाली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:53+5:302021-09-25T04:28:53+5:30
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेले वासेरा हे अंदाजे चार हजार लोकसंख्या असलेले गाव. १९६४ साली या गावात ग्रामपंचायत ...

वासेरात दोन वर्षांनी झाली ग्रामसभा
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेले वासेरा हे अंदाजे चार हजार लोकसंख्या असलेले गाव. १९६४ साली या गावात ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यावेळी केवळ सात सदस्य कारभार पाहत होते. परंतु आज अकरा सदस्य असलेली ग्राम पंचायत कार्यरत आहे. येथील ग्रामसभा म्हणजे वादविवादाचा आखाडा असायचा. परंतु सध्या ग्राम पंचायत पदाधिकारी यांचा समजूतदारपणा व ग्रामसेवक यांची समयसूचकता कारणीभूत ठरल्याने गावकऱ्यांवर चांगलाच फरक जाणवला. सरपंच महेश बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता ग्रामसभा सुरू झाली. ग्रामसेवक नरेंद्र वाघमारे यांनी सभेतील विषयाचे वाचन करून सभेला सुरुवात केली. ग्रामविकासाच्या विकासात्मक बाबींवर चर्चा करताना एकूण बारा विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले.
240921\img_20210922_140301.jpg
ग्रामसभेत उपस्थित गावातील नागरिक