ग्राम पंचायत मंगी ( बु ) ठरते जिल्हातील स्मार्ट ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:19+5:302020-12-28T04:15:19+5:30

कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील आशाताई व समन्वयक यांचा अभ्यास दौरा राजुरा राजुरा तालुक्यातील ग्राम पंचायत ...

Gram Panchayat Mangi (Bu) is the smart village in the district | ग्राम पंचायत मंगी ( बु ) ठरते जिल्हातील स्मार्ट ग्राम

ग्राम पंचायत मंगी ( बु ) ठरते जिल्हातील स्मार्ट ग्राम

कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील आशाताई व समन्वयक यांचा अभ्यास दौरा

राजुरा

राजुरा तालुक्यातील ग्राम पंचायत , मंगी (बु.) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ही बाब ग्रामस्थांना जाणवू लागली. मंगी (बु.) गावाच्या विकास कामाचा अभ्यास करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउन्डेशनच्या माध्यमातून कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील आशाताई, आरोग्य सखी, पशु सखी अंगणवाडी ताई आणि आरोग्य सेविका यांनी दिनांक 25/12/2020 भेट देवून गावाच्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी केली. ग्राम पंचायत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्राम पंचायतचे उपसरपंच वासुदेव चापले, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे जितेंद्र बैस, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम ( मुख्याध्यापक मंगी खु ), पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे , ग्रा.पं.सदस्य शंकर तोडासे , ग्रा. पं. सचिव गजानन वंजारे यांचे प्रमुख उपस्थितीत कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील आशाताई, आरोग्य सखी, पशु सखी अंगणवाडी ताई आणि आरोग्य सेविका यांची बैठक घेण्यात आली. उपसरपंच वासुदेव चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 5 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहे. पुढेपण सातत्याने सुरु राहणार असल्याचे खात्रीपुर्वक सांगितले ही बाब अभ्यास दौऱ्यातून पाहणी करतांना स्वच्छता पाहून तर भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 850 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, शालेय परिसर स्वच्छ, शाळा बंद पण शिक्षण सुरु उपक्रमाची अंमलबजावणी, 100 टक्के करवसुलीचे प्रयत्न , युवक - युवतीसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग ग्रामपंचायत शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार ग्रा.पं.चे सचिव गजानन वंजारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी . नितीन मरस्कोल्हे, शवसंत सोयाम, सुरेश येमुलवार , चरणदास चिलकुलवार , आणि किसन कोडापे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Gram Panchayat Mangi (Bu) is the smart village in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.