समाजकार्य महाविद्यालयात पदवीदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST2021-02-26T04:41:30+5:302021-02-26T04:41:30+5:30

चंद्रपूर : सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूरद्वारा ...

Graduation Ceremony at the College of Social Work | समाजकार्य महाविद्यालयात पदवीदान समारंभ

समाजकार्य महाविद्यालयात पदवीदान समारंभ

चंद्रपूर : सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूरद्वारा महाविद्यालयीनस्तरीय प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, समाज कार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजीव निंबाळकर, डॉ. नीलेश ढिकरे, प्रा. नरेंद्र टिकले आदी उपस्थित होते.

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये एम. एस. डब्ल्यू अंतिम वर्षातून द्वितीय मेरीट मनोज कोवे, बी. एस. डब्ल्यू अंतिम वर्षांची द्वितीय मेरिट संगीता बुरडकर, तृतीय नम्रता कुकुडकर, सत्र २०१८- १९ अंतिम वर्षात द्वितीय मेरिट माधुरी मिस्त्री, पाचवी मेरिट चैताली थेरे, बी. एस. डब्ल्यू अंतिम वर्षात तृतीय मेरिट प्रणिता वावरे, पाचवा मेरिट श्रीकृष्ण शेंडे यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले, संचालन प्रा. डॉ. पुरुषोत्तम बोरकर तर आभार प्रा. डॉ. सुभाष गिरडे यांनी मानले.

Web Title: Graduation Ceremony at the College of Social Work