गो. वा. महाविद्यालयाचे विद्यापीठ निकालात सूयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:55+5:302021-01-13T05:12:55+5:30
या शैक्षणिक सत्रात विद्यापीठाच्या मेरिट सूचीमध्ये गोविंदराव वारजूकर कला, वाणिज्य व पदव्युत्तर महाविद्यालयातील पूनम पुरुषोत्तम करुटकर बि. ए. अभ्यासक्रमाच्या ...

गो. वा. महाविद्यालयाचे विद्यापीठ निकालात सूयश
या शैक्षणिक सत्रात विद्यापीठाच्या मेरिट सूचीमध्ये गोविंदराव वारजूकर कला, वाणिज्य व पदव्युत्तर महाविद्यालयातील पूनम पुरुषोत्तम करुटकर बि. ए. अभ्यासक्रमाच्या भूगोल विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून पहिले स्थान पटकावले आहे. महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी विषयात कोमल विजय क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक तर विद्या मुरलीधर गोबडे हिने तृतीय स्थान पटकाविले आहे. एम.ए. (मराठी) अभ्यासक्रम (आदिवासी प्रवर्ग) यातून छबु जनार्धन नैताम हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. एम.ए. समाजशास्त्र विषयात तुळशीदास मोतीराम शेंडे याने तृतीय, अनिल रमेश सातपैसे याने चौथे तर समता दत्ताप्रभु उके हिने नववे स्थान प्राप्त केले आहे. मानव विज्ञान शाखा बी. ए. मधून पूनम पुरुषोत्तम करुटकर या विद्यार्थिनीने एकूण सजीपीए ८.२० मिळवून विद्यापीठात आठव्या क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय सिंग, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवी रणदिवे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनमोल शेंडे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक सालोटकर यांचे मार्गदर्शन लाभले.