गाढवाची धिंड काढून शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:28 IST2019-07-12T00:27:08+5:302019-07-12T00:28:25+5:30
केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नोदविला.

गाढवाची धिंड काढून शासनाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नोदविला.
तसेच बस स्टॉप चौकात जनतेला पुष्पगुश्च देवून ‘अच्छे दिन आयेंगे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिलेल्या खोट्या आश्वासनाची आठवण जनतेला करून दिली. यावेळी याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, अल्प संख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अॅड. मलिक शाकिर, केशव रामटेके, अश्विनी खोब्रागडे, संजय रत्नपारखी, हरीदास लांडे, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष कुणाल रामटेके, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, सोहेल शेख, इकबाल भाई, मोहन डोंगरे, प्रकाश अधिकारी, घनश्याम वासेकर, बंडोपंत्त तातावार, शलिनी भगत, सुनिता सिंग व कार्यकते बहुसखेने उपस्थित होते.
शासनाच्या धोरणाविरोधात व महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने बल्लारपूरसह जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.