अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST2021-01-20T04:28:29+5:302021-01-20T04:28:29+5:30
लोककल्याण बहूद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलाची शाळा, नागभीड व स्वामी विविकानंद मुलाचे बालगृह नागभीड अशा ...

अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
लोककल्याण बहूद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलाची शाळा, नागभीड व स्वामी विविकानंद मुलाचे बालगृह नागभीड अशा दोन संस्था कार्यरत आहेत. येथील स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या निवासी शाळेला ‘अ’ श्रेणीचा दर्जा असून यामध्ये १८ वर्षाखालील दोन विद्यार्थी तर १८ वर्षावरील पाच विद्यार्थी वास्तव्यास आहेत. १८ वर्षावरील मुलांना शाळेत ठेवता येत नसल्याने त्यांचे स्थानांतरण करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या शाळेला शासनाकडून कोणतेही आर्थिक साहाय्य मिळत नाही. कोरोनातही कुठल्याही प्रकारचे अन्नधान्य मिळाले नाही. त्यामुळे मुलांच्या पालनपोषण करण्यास अडचण जात आहे. याबाबत शासनाकडे तसेच संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे येत्या १० दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास कर्मचारी व विद्यार्थ्यांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संस्थाचालक पुरुषोत्तम चौधरी यांनी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.