शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: December 28, 2015 01:28 IST2015-12-28T01:28:18+5:302015-12-28T01:28:18+5:30

शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून या तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थाकडे पाठ फिरविली आहे.

The government's milk chilling center will be closed on the way | शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर

शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर

नागभीड: शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून या तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी नागभीड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन नागभीड तालुक्यात होते. किंबहुना दुधाचे आगर म्हणूनही नागभीड तालुक्याची ओळख आहे. ही उत्पादन क्षमता लक्षात घेऊनच शासनाने नागभीड येथे दूध शीतकरण केंद्र मंजूर केले, पण खेदाची बाब अशी की, या शीतकरण केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन भरुन काढण्यासही हेशितकरण केंद्र महाग झाले आहे.
या शीतकरण केंद्रावर अशी अवस्था प्राप्त होण्यास कर्मचारी नाही तर शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत या शीतकरण केंद्राला नागभीड आणि जवळच्या तालुक्यातून दुधाचा पुरवठा होत होता. पण तीन- तीन महिने दूध उत्पादकांचे वेतन अदा न करणे लहान-लहान कारणावरुन दूध उत्पादक आणि दूध उत्पादक संस्था चांगल्याच मेटाकुटीस आल्या होत्या. दरम्यान, तालुक्यात खासगी दूध कंपन्यांनी नागभीड तालुक्यात आपले पदार्पण केले. केंद्र शासनाच्या दरापेक्षा जास्त दर, दर १० दिवसांनी वेतन देऊन कंपन्यांनी प्रत्येक गावात आपल्या शाखा सुरु केल्या. प्रारंभी या शाखांना थोडा त्रास झाला. लवकरच या खासगी कंपन्यांनी तालुक्यातील दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना थंड करुन दूध उत्पादकांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. आजघडीला संपूर्ण नागभीड तालुक्यातील दुग्ध उत्पादक सहकारी संस्था डबघाईस आल्या असून ज्या बोटावर मोजण्याइतपत सहकारी संस्था जिवंत असतील, त्यांनीही खासगी कंपन्यांची कास धरल्याचे वृत्त आहे.
परिणामी नागभीड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राला दुधाचा पुरवठाच बंद झाल्यासारखा आहे. आठ- दहा वर्षाअगोदर १२ ते १४ हजार लीटर दुधाचा पुरवठा ज्या शीतकरण केंद्रात होत होता, त्याच शीतकरण केंद्रात आज केवळ हजार लिटर दुधाचा पुरवठा होत आहे. ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. या उलट खासगी दूध कंपन्यांची स्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The government's milk chilling center will be closed on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.