पाऊस कमी झाला म्हणणे शासनाची लबाडी
By Admin | Updated: March 16, 2015 00:37 IST2015-03-16T00:37:16+5:302015-03-16T00:37:16+5:30
पाण्याच्या बाबतीत येणारा काळ हा फार भीषण आहे. त्यासाठी आतापासूनच प्रामाणिकपणे नियोजन करणे आवश्यक आहे.

पाऊस कमी झाला म्हणणे शासनाची लबाडी
भद्रावती : पाण्याच्या बाबतीत येणारा काळ हा फार भीषण आहे. त्यासाठी आतापासूनच प्रामाणिकपणे नियोजन करणे आवश्यक आहे. फाऊस कमी झाला म्हणून बोंबा मारणे ही शासनाची लबाडी आहे. पाऊस कमी नाही तर, वाढतच आहे असे मत भूवैज्ञानिक व शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानोरकर यांनी व्यक्त केले.
ग्राहक पंचायत शाखा कोंढातर्फे रविवारी कोंढा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्कर ताठे, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, कृषी अधिकारी आर.पेचे. मधुसूदन धुमकर, मिसाळ, खिचडे, विजय गुंडावार, वामन नामपल्लीवार, सेवकराव मिलमिले पुरुषोत्तम सलामे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)