सरकारी गव्हाचा काळाबाजार; दोघांना अटक

By Admin | Updated: April 27, 2015 00:57 IST2015-04-27T00:57:00+5:302015-04-27T00:57:00+5:30

पडोलीच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठी ८० क्विंटल गव्हाची शासकीय गोडावूनमधून उचल करून तो गहू परस्पर विकण्याचा ...

Government Wheat's Blackberry; Both arrested | सरकारी गव्हाचा काळाबाजार; दोघांना अटक

सरकारी गव्हाचा काळाबाजार; दोघांना अटक

घुग्घुस : पडोलीच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानासाठी ८० क्विंटल गव्हाची शासकीय गोडावूनमधून उचल करून तो गहू परस्पर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पडोलीच्या सरकारी स्वस्त दुकानदाराला एलसीबी चंद्रपूरच्या पथकांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश चंदुलाल नाडा, मेटॅडोर चालक गणेश विठ्ठल फुलसंगे व सुशिला दिलीप मत्ते यांना मुद्देमालासह अटक करून ईसी एक्टचा गुन्हा नोंदविला. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गरीब लोकांना राशन कार्डद्वारे वितरण करण्याकरिता पडोली येथील सरकारी स्वस्त दुकानदार प्रकाश चंदुलाल नाडा यांनी शनिवारी सायंकाळी यशवंतनगरच्या शासकीय गोडाऊनमधून ८० क्विंटल (१६० कट्टे किंमत ९६ हजार) गव्हाची उचल केली. सदर गहू दुकानात न नेता मेटॅडोरमधून (एम.एच. ३३-४५१४) कुटाला येथील सुशिला दिलीप मत्ते यांच्या घरी उतरवीत असताना एलसीबीच्या पथकांनी रंगेहात पकडले. मेटॅडोरसह ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरा त्याच्याविरुध्द ईसी एक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पी.जे. टिक्कस, सहायक पोलीस निरीक्षक कुंटलवार यांनी केली. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Government Wheat's Blackberry; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.