शासकीय कार्यालये प्रभारींच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:45+5:302021-02-05T07:37:45+5:30

तळोधी बा.: तळोधी बा.अप्पर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात महत्त्वाची पदे रिक्त असून प्रभारी अधिकारी म्हणून कार्यालयात पदे भूषवित असल्याने ...

Government offices in charge of trust | शासकीय कार्यालये प्रभारींच्या भरवशावर

शासकीय कार्यालये प्रभारींच्या भरवशावर

तळोधी बा.: तळोधी बा.अप्पर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात महत्त्वाची पदे रिक्त असून प्रभारी अधिकारी म्हणून कार्यालयात पदे भूषवित असल्याने तळोधी बा.व परिसरातील जनतेला त्रासदायक ठरत असून कायमस्वरुपी अधिकारी नेमण्याची मागणी जनतेने केलेली आहे.

तळोधी बा.येथील अप्पर तहसीलदार ,तळोधी येथील तलाठी,तळोधी बा.येथील ग्रामविकास अधिकारी ,तळोधी बा.येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, तळोधी बा.येथील पशुवैद्यकीय अधिकारी ,तळोधी बा.येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने सर्व प्रभारी अधिकारी वर्गावर अवलंबून असल्याने तळोधी बा.येथील जनतेला शासकीय व वैद्यकीय कामाकरिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग प्रभारी अधिकारी वर्गावर अवलंबून असताना मात्र लोकप्रतिनिधींचेसुद्धा दुर्लक्ष होत असल्याने जनतेला वेठीस धरले जात आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून त्वरित रिक्त पदे भरण्याची मागणी जनतेने केली आहे.

Web Title: Government offices in charge of trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.