शासनाने पाठ फिरवली

By Admin | Updated: October 31, 2015 01:57 IST2015-10-31T01:57:23+5:302015-10-31T01:57:23+5:30

केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने ...

The government has chased away | शासनाने पाठ फिरवली

शासनाने पाठ फिरवली

राष्ट्रवादीचे निवेदन : महागाई कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने वेठीस धरून शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली. जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.
राज्यातील व केंद्रातील सरकार केवळ घोषणाबाज आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ धोरण राबविण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वर्षभराच्या कालावधीत काहीच केले नाही. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, कृषी पंपाना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत देण्यात यावी, महागाईवर नियंत्रण आणण्यात यावे, इंधनावरील अधिभार रद्द करण्यात यावा यासह अन्य १३ प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे, दीपक जयस्वाल, शशीकांत देशकर, बेबी उईके, ज्योती रंगारी, डी. के. आरीकर, महेंद्र लोखंडे आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The government has chased away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.