जिवती तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:58 IST2017-10-23T22:58:14+5:302017-10-23T22:58:35+5:30
अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले.

जिवती तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले.
सोमवारी देवलागुड़ा येथे जगदंबा देवीची मूर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापना कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. अॅड.संजय धोटे, खुशाल बोंडे, राजेश रोडे, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जि.प.सदस्य कमलबाई राठोड, पंचायत समिती सदस्या अंजनाबाई राठोड, सरपंच अनिता मस्के, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, प्रल्हाद राठोड, गोपिनाथ चव्हाण, अशोक नाईक, अंतराम वाकळे आदी उपस्थित होते. देवलागुड़ा येथील जगदंबादेवीची मुर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापना करण्यासाठी बंजारा समाजाचे प्रेरणास्थान तपस्वी रामराव महाराज उपस्थित राहणार होत.े मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड आल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मुर्ती स्थापना व सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे कळस तसेच पगडी व खडाऊची स्थापनेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मात्र त्यानंतर आयोजीत कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी गावतील नागरिक, पोलीस बांधव तसेच पोलीस मित्रांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश राठोड यांनी केले. संचालन राजेश राठोड यांनी केले.