सरकारी स्वस्त धान्य संघटनांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:29 IST2021-05-06T04:29:46+5:302021-05-06T04:29:46+5:30
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनवरून धान्यवाटप विरोधासह व इतर मागण्यांसाठी १ मेपासून संप पुकारल्यामुळे ...

सरकारी स्वस्त धान्य संघटनांचा संप मागे
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनवरून धान्यवाटप विरोधासह व इतर मागण्यांसाठी १ मेपासून संप पुकारल्यामुळे धान्यवाटप योजनेला ब्रेक लागला होता. मात्र यावर तोडगा निघाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्येच दुकानदारांनी संप पुकारल्यामुळे प्रशासनाची कोंडी, रेशन धान्यावरच दीनचर्या असलेल्या गरीब कुटुंबीयांचे हाल होत होते. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी घेतली होती. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी व चिमूर तहसीलदार यांना निवेदनाही देण्यात आले होते. सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना चिमूर यांच्या लढ्याला अखेर यश आले. बुधवारपासून संप मागे घेण्यात येत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटना चिमूरचे अध्यक्ष संजय पाटील यांनी कळविले आहे.