शासन बदलले ; मात्र शेतकऱ्यांची निराशाच
By Admin | Updated: January 1, 2015 22:58 IST2015-01-01T22:58:43+5:302015-01-01T22:58:43+5:30
राज्यात सत्ता बदल होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, जुन्या सरकारच्या काळात ज्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत होते, त्यांच समस्यांना आजही शेतकऱ्यांना तोंड

शासन बदलले ; मात्र शेतकऱ्यांची निराशाच
उपरी :राज्यात सत्ता बदल होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, जुन्या सरकारच्या काळात ज्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत होते, त्यांच समस्यांना आजही शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. धानाची कवडीमोल भावात विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याला राज्य सरकारच जबाबदार आहे.
गतवर्षी धानाला समाधानकारक भाव मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यातच नवीन धान खरेदी सुरू झाली. त्या वेळी सुरुवातीस २१०० रुपये प्रति क्विंटल भाव होता. डिसेंबर महिन्यात २०० रुपये भाववाढ झाली. मात्र, युती शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नववर्षाला प्रारंभ झाला. मात्र, धानाला योग्य भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.
केंद्र शासनाने पाठपुरावा न केल्याने यावर्षी सुरुवातीस धानाला १९०० रुपये तर आजच्या स्थितीत २१०० रुपये प्रति क्विंटल भाव अ दर्जाच्या धानाला आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होवून धान पीक घेतात. (वार्ताहर)