गोवारदिपे यांच्या दातृत्त्वावर पालकमंत्री झाले आनंदीत
By Admin | Updated: December 22, 2015 01:17 IST2015-12-22T01:17:09+5:302015-12-22T01:17:09+5:30
येथील म.जोतिबा फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एन.एम. गोवारदिपे हे आपल्या सेवानिवृत्त वेतनातील

गोवारदिपे यांच्या दातृत्त्वावर पालकमंत्री झाले आनंदीत
बल्लारपूर : येथील म.जोतिबा फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एन.एम. गोवारदिपे हे आपल्या सेवानिवृत्त वेतनातील (पेंशन) एक महिन्याची (किमान ३५ हजार रुपये) रक्कम सेवाभावी वा सामाजिक संस्थेला समाजोपयोग म्हणून देत असतात. त्यांचा हा दातृत्वाचा क्रम गेल्या पाच वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. तद्वतच ते वृक्षमित्रही आहेत. वृक्षसंवर्धनाकडे ते आवडीने लक्ष देतात. याबाबत त्यांचा सत्कारही झालेला आहे.
प्रा.गोवारदिपे यांचे हे कार्य राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळले आणि मंत्री आपल्या दारी या जनसंपर्क दौऱ्यात वॉर्डा-वॉर्डात फिरताना त्यांनी प्रा.गोवारदिपे यांच्या राजेंद्रनगर वॉर्डातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. प्रा.गोवारदिपे आणि कुंदा गोवारदिपे यांनी ना. मुनगंटीवार यांचे पुष्पमालांनी स्वागत केले. चर्चेत, मुनगंटीवार यांनी प्रा.गोवारदिपे यांच्या दातृत्वाची प्रशंसा केली. गोवारदिपे यांच्याप्रमाणे सर्वांनीच दातृत्वासाठी पुढे यावे, असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)