शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द उजवा कालव्याचे काम अर्धवट

By admin | Updated: August 27, 2016 00:37 IST

तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे.

पाण्याअभावी पिके संकटात : जनकापूर - पळसगाव येथील शेतकऱ्यांना फटकातळोधी (बा.): तळोधीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. या कालव्याचे काम करताना मोडतोड केल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. जवळपास ८० एकर क्षेत्राला याचा फटका बसत आहे. त्यामुळे या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केलेली आहे.मागील सात वर्षापूर्वी जनकापूर- पळसगाव (खुर्द) या गोसीखुर्द उजव्या कालव्याचे करोडो रुपये खर्च करुन काम करण्यात आले. निधीअभावी या कालव्याचे काम मधेच सोडून देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचाई विभाग नागभीड अंतर्गत जनकापूर- येथील गट नं. ३४८ मामा तलावाचे निस्तार हक्कानुसार पाणी मिळत होते. मात्र गेल्या सात वर्षापासून गोसीखुर्द उजव्या कालव्याचा अर्धवट काम केल्यापासून सदर शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मिंडाळा मंडळातील ८० एकरात पिकांची लागवड करून आपल्या पोटाची खडगी भरणारे शेतकरी दयाराम नान्हे, डुकरु नान्हे, हिरालाल शेंडे, पुरुषोत्तम गुरुनुले, आशीष गुरुनुले, सुरेश पाटील काशिवार, अरुण काशिवार, मानिक शेंडे, पुरुषोत्तम नवघडे, सोमेश्वर बावनघडे, महेश तोडासे, मारोती मोहुर्ले व अरविंद शेंडे या शेतकऱ्यांना निस्तार हक्कानुसार सदर तलावाचे पाणी लागू असताना सदर कालव्यामुळे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सदर शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून स्थानिक आमदारांना या कल्पनेची माहिती देऊनसुद्धा ते शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या जनकापूर- पळसगाव गोसीखुर्द उजव्या कालव्यामध्ये पळसगाव येथील हिरालाल शेंडे यांची गट नं. ४६ ची शेतजमीन गेली आहे. मात्र त्यांना अद्यापही याचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यांना यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागत आहे.अगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जापायी आत्महत्या करीत आहे. तरीही शासन व्यवस्थेकडून बळीराजाची थट्टा केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व बळीराजाचे पीक वाचविण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)मागील सात वर्षापूर्वी जनकापूर - पळसाव गोसीखुर्द उजव्या कालव्याचे अर्धवट कामे करुन निस्तार हक्क असणाऱ्या जनकापूर सिंचाई मामा तलावाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित केले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पीडित शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी कर्ज काढून उपाययोजना कराव्या लागत आहे. शासनाने मोडकळीस आलेला जनकापूर मामा तलावाचा कालवा (पाट) दुरुस्त करुन पाणी उपलब्ध करुन द्यावे. - अतुल सिद्धमशेट्टीवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष