गोसेखुर्दच्या कालव्याने शेतकरी झाले भूमिहीन

By Admin | Updated: May 17, 2016 00:40 IST2016-05-17T00:40:11+5:302016-05-17T00:40:11+5:30

पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक शेतकरी लहानशा जमिनीच्या तुकड्यावर मोलमजुरी करून पोटाची भाकर खात आहेत.

Gosekhurd's canal became a farmer, landless | गोसेखुर्दच्या कालव्याने शेतकरी झाले भूमिहीन

गोसेखुर्दच्या कालव्याने शेतकरी झाले भूमिहीन

ब्रह्मपुरी तालुका : पिंपळगावातील शेतकऱ्यांच्या जमिनी उजव्या कालव्यात
ब्रह्मपुरी : पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक शेतकरी लहानशा जमिनीच्या तुकड्यावर मोलमजुरी करून पोटाची भाकर खात आहेत. मात्र गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात अनेकांची शेती गेल्याने बहुतांश शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. मोबदल्यात मिळालेली रक्कम खर्च झाली आणि शेतीही राहिली नाही. त्यामुळे आता जगाचे कसे, असा ज्वलंत प्रश्न परिसरातील भूमिहिनांपुढे उभा ठाकला आहे.
आजही ग्रामीण भागात घरच्या अत्यावश्यक कामासाठी शेती विकतो म्हटले तर भूमिहीन होता येत नाही, तसा कायदा आहे. परंतु, परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या एक एकर, अर्धा एकर जमिनीतून गोसेखुर्दचा कालवा गेला. व विक्री करताना मात्र कंत्राटदार १० आर जमीन ठेवून विक्री केली. सर्व आयुष्य एकर, दोन एकरात सुखी समाधानाने गेले नाही तर १० आर जागेत शेतकऱ्यांचे कोणते भाग्य उजळणार आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकर, दोन एकर शेती असताना अनेक शेतकरी स्वत:साठी घर बांधू शकले नाही. २४ तास दोन घासासाठी संघर्ष करताना परिसरातील शेतकरी दिसून येतो. मग उजव्या कालव्यात गेलेल्या शेतीत कंत्राटदाराने शिल्लक ठेवलेल्या १० आर जागेत काय करणार, १० आर जमीन असली तरी तो शेतकरीच झाला. मात्र शासनाच्या नजरेत भूमिहीन या व्याख्येतून तो शेतकरी सुटला आहे. शेती गेली, पैसा मिळाला. त्या पैशाचा उपयोग काही शेतकऱ्यांनी चांगला केला तर काहींनी व्यर्थ केला. आत तर पैसाही नाही आणि शेतीही नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून अनेकांना केवळ १० आर जागेसाठी भूमिहीन असतानाही अल्पभूधारक म्हणून नोेंद आहे.
शासनाने जमीन अधिग्रहीत करताना सर्व शेती अधिग्रहीत करणे आवश्यक आहे. कारण १० आर जागेत कोणतेच उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्यामुळे ती जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. तर एवढ्या जागेची विक्रीही होत नसल्याने विक्रीविना श्रीमंत व्यक्ती उर्वरीत जमीन अगदी अल्पदरात खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू शकतात, अशी स्थिती शेतकऱ्याची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gosekhurd's canal became a farmer, landless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.